जाणत्या काव्यरसिकांसाठी ‘समग्र सदानंद रेगे’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्यांची कविता जाणिवेच्या पलीकडे जात राहते असे कवी, कथाकार, नाटककार, अनुवादक, व्यंगचित्रकार, चित्रकार सदानंद रेगे. त्यांच्या कवितांमध्ये कायम दृश्यमानता, चित्रस्पर्श जाणवतो. याचे कारण रेगे यांच्या निर्मितिशीलतेवर चित्रकलेचे संस्कार आहेत. तसेच रंगभूमी आणि नाटक यांचेही. त्यांच्या शब्दांच्या योजनांतून आकाराला आलेली ही दृश्ये आकार कल्पनानिर्मित आहेत.

सोबत ती स्वतच्या शब्दकळेने, जीवनजाणिवेने संपन्न आहे. यामुळेच त्याच्या काव्याचा रसिकही तितकाच जाणता. अशा जाणत्या रसिकांसाठी पॉप्युलर प्रकाशनाद्वारे सदानंद रेगे यांच्या कवितांची सुंदर भेट आणली आहे. सदानंद रेगे यांच्या ‘अक्षरवेल’, ‘गंधर्व’, ‘देवापुढचा दिवा’, ‘ब्रांकुशीचा पक्षी’, ‘वेडय़ा कविता’ आणि या संग्रहानंतरची वेगवेगळ्या दिवाळी अंकात, नियतकालिकांतून विखुरलेल्या त्यांच्या कविता ‘समग्र सदानंद रेगे’ या ग्रंथाद्वारे पॉप्युलर प्रकाशनातर्फे लवकरच प्रकाशित होत आहेत. हा ग्रंथ ज्येष्ठ लेखक, कवी वसंत आबाजी डहाके यांनी संपादित केला आहे.