विश्वासघाताचा हिशेब जनता चुकता करेल, संजय राऊत यांनी डागली तोफ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्यांना शिवसेनेने ओळख दिली, शिवसैनिकांनी खांद्यावर घेऊन मोठे केले, त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. हा केवळ पक्षांतराचा विषय नसून लाखो शिवसैनिकांच्या भावनांशी केलेला विश्वासघात आहे. जनता या विश्वासघाताचा हिशेब चुकता करेल,’ असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी यावेळी दिला.

‘इकडचा खासदार हा एक नंबरचा बदमाश माणूस होता. त्याने एकदा गद्दारी केली तेव्हा शिवसैनिकांनी रस्त्यावर तुडवला. तो परत आला. उद्धव ठाकरे यांची, शिर्डीकरांची माफी मागितली आणि पुन्हा शंभर कोटीला विकला गेला, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला. ‘तीन वेळा साईबाबांची शपथ घेऊन हा म्हणाला होता की मी मरेपर्यंत तुमच्यासोबत राहीन. मग आता कुठे मरायला गेला? एक रुपयाही खर्च न करता हा खासदार झाला. खर्च पक्षाचा, कष्ट शिवसैनिकांनी केले. उद्धव ठाकरे यांना मानणाऱ्या मतदारांनी याला मतं दिली. एक रुपया खर्च न करता याने शंभर कोटी मिळवले. हा धंदा त्याने केला. याची किंमत त्याला मोजावी लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.