
अमेरिकेतील ओहियो राज्यातील एका मोटलला लागलेल्या आगीत तीन हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हे मूळचे गुजरातमधील रहिवासी होते. मृतांमध्ये हितेशभाई सुथार, त्यांची पत्नी हिनाबेन सुथार आणि त्यांची 20 वर्षीय मुलगी ईशानी या तिघांचा मृत्यू झाला आहे. हे कुटुंब दोन वर्षांपूर्वीच अमेरिकेच्या वूस्टरमध्ये स्थायिक झाले होते. हितेशभाई स्थानिक इकोनो लॉज मोटलमध्ये काम करत होते, तर त्यांचे कुटुंब तेथेच राहत होते.




























































