
‘ऑपरेशन तुडवा’ची झलक बघितल्यापासून गद्दार खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या बुडाला आग लागली आहे. आता सगळ्या मतदारसंघात फिरणार, अशी दर्पोक्तीही आष्टीकर यांनी केली. त्यावर ‘आव्हान काय देतो, हिंमत असेल तर फिरून दाखव! दिसला तिथे नाही तुडवला तर नाव सांगणार नाही!’ असे शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी सुनावले आहे. ‘वाय असो, झेड असो, नाहीतर आणखी कोणतेही सुरक्षा कवच घालून फिर… शिवसैनिक गद्दारीचा जाब विचारणारच!’ असेही खराटे यांनी ठणकावले.
गद्दार गँगचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि नागेश पाटील आष्टीकर हे किनवट तालुक्यातील सारखणी येथे आरोग्य शिबिरासाठी जात असताना शिवसैनिकांनी पोलिसांची दंडेली झुगारून त्यांना काळे झेंडे दाखवले होते. ‘नीम का पत्ता कडवा है, नागेश पाटील… है’ या घोषणांनी माहूर रस्ता दुमदुमुन गेला होता. शिवसैनिकांनी ‘ऑपरेशन तुडवा’ची झलक दाखवल्यामुळे तिळपापड झालेल्या नागेश पाटलांनी ‘सगळ्या मतदारसंघात फिरणार, कोण काय करतो बघू’ अशी धमकी दिली.
गद्दार नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी जोरदार पलटवार केला. ‘पैशासाठी इमान विकणाऱ्या नागेश पाटलांनी आम्हाला धमकावण्याच्या भानगडीत पडू नये. शिवसैनिकांच्या संतापाची झलक कालच दाखवली आहे. हिंमत असेल तर मतदारसंघात दौरा कराच, दिसेल तिथे शिवसैनिक तुडवल्याशिवाय राहणार नाही. जर एवढीच मिजास असेल तर सुरक्षा बाजूला ठेवा आणि मग बघा, शिवसैनिक काय करतो ते!’ अशा तिखट शब्दांत खराटे यांनी आष्टीकरांना सुनावले.




























































