
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा विदेश दौऱयावर जाणार आहेत. मोदी 6 जुलै ते 11 जुलैपर्यंत तीन देशांचा दौरा करणार आहेत. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा दौरा करणार आहेत. याआधी मोदींनी मे महिन्यात यूएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीचा दौरा केला होता. तर जून महिन्यात 13 ते 18 जूनला फ्रान्स आणि स्लोव्हाकियाचा दौरा केला होता. त्यानंतर 27 ते 29 जूनला सेशेल्सचा दौरा केला होता.




























































