
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील चादरी, उशांची कव्हरे धुण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च करून टनेल लाँड्रीची योजना आहे. टनेल लाँड्री ही प्रामुख्याने हॉटेल व रेल्वेतील सामान्य वापरातील चादरी धुण्यासाठी करण्यात येते. पण रुग्णालयातील चादरी प्रामुख्याने रुग्णाचे रक्त, घाण व संसर्गजन्य आजाराच्या संपका&त आलेल्या असतात अशा प्रकारच्या जोखमीच्या चादरींसाठी आरोग्याच्या दृष्टीने टनेल लाँड्री योग्य नाही. त्यामुळे टनेल लाँड्रीचा पुनर्विचार करण्याची गरज शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज व्यक्त केली.
सत्ताधारी पक्षाच्या 293 च्या प्रस्तावावर बोलताना सुनील प्रभू यांनी मुंबई महापालिकेतील पैशाच्या उधळपट्टीवर बोट ठेवले. पालिकेच्या वर्क्स कमिटीकडे प्रस्ताव येतात त्या ठेकेदाराला पालिकेचा इंजिनीयर पह्न करतो. वर्क्स कमिटी अध्यक्षाला भेट असे सांगतात. ते कशासाठी भेटा सांगतात त्याचा कानोसा घ्या मग मुंबई महापालिकेत काय चालले आहे ते कळेल, असा टोला सुनील प्रभू यांनी यानिमित्ताने सत्ताधारी पक्षाला मारला.
शालोपयोगी साहित्यापासून वंचित
केंद्र सरकारच्या पोर्टलवर शालेय विभागाच्या वस्तू खरेदीत पैसे वाचले, पण बूट व अन्य काही वस्तू वगळता इतर वस्तू मध्यस्थामार्फतच घ्याव्या लागल्या. शालेय साहित्यांपासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागले.
लक्ष्मी दर्शन कोणाला होते?
महापालिकेच्या व्हिजिलन्स डिपार्टमेंटवरही त्यांनी यावेळी हल्लाबोल केला. पर्चेस ऑर्डरची चौकशी करण्यासाठी व्हिजिलन्सकडे पाठवले जातात तेव्हा लक्ष्मी दर्शन कोणाला होते, असा सवाल त्यांनी केला.
प्रस्तावाची चौकशी करा
पालिकेतील रुग्णालयातील चादरी धुण्यासाठी टनेल लाँड्रीच्या संकल्पनेचा बारकाईने विचार होणे गरजेचे आहे. कारण 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. तांत्रिक माहिती व आर्थिक परिणाम व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने या प्रस्तावात गंभीर त्रुटी आहे. या प्रस्तावामुळे पालिकेवर प्रचंड आर्थिक बोजा पडणार आहे आणि काही विशिष्ट कंत्राटदारांना लाभ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे संपूर्ण प्रस्तावाची स्वतंत्र व निःपक्षपणे चौकशी होणे करण्याची मागणी सुनील प्रभू यांनी केली.




























































