
पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते, त्यामुळे पचायला हलके, ताजे आणि गरम अन्न सेवन करा. शक्यतो कोमट किंवा उकळून थंड केलेले पाणी प्या. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारात आले, लसूण, हळद आणि लिंबू यांचा समावेश करा.
मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडांखाली किंवा कमकुवत छताखाली उभे राहणे टाळा. पावसाळ्यात पालेभाज्यांमध्ये अळ्या असण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे त्या खाणे टाळा किंवा चांगल्या उकळून खा.




























































