इराणमध्ये खामेनी यांच्या अंत्यविधीला सुरुवात; काळे कपडे घालून लाखो लोकांचा सहाभाग, 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शनिवारी तेहरानच्या ग्रँड मोसल्ला येथे लाखो लोक जमले होते. शिया परंपरेनुसार काळे कपडे घातलेल्या लोकांनी छाती बडवून शोक व्यक्त केला. खामेनी यांच्या अंत्यविधीला तेहरानमध्ये 3 जुलै रोजी सुरुवात झाली असून ती 9 जुलैपर्यंत सुरू राहील.

खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला शुक्रवारपासून सुरुवात झाली. खामेनी यांची शवपेटी तेहरानमधील इमाम खुमैनी ग्रँड मुसल्ला येथे पोहोचवण्यात आली. त्यात 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अली खामेनी यांच्यासोबत त्यांच्या 14 महिन्यांच्या नातीला, मुलीला, पत्नीला आणि जावयालाही श्रद्धांजली वाहण्यात आली. अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या सर्व सामान्य लोकांसाठी तेहरानमध्ये मेट्रो आणि सरकारी बसमध्ये प्रवास मोफत करण्यात आला. याशिवाय हॉटेलच्या भाड्यात 50 टक्के सूट आणि शाळा-मशिदींमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

इराणला एका आठवड्याची सुट्टी – ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डकोटा येथील प्रसिद्ध ‘माउंट रशमोर’ येथे एका सभेत सांगितले की, मानवतावादी दृष्टिकोनातून इराणला त्यांच्या सर्वोच्च नेत्याच्या अंत्यसंस्कारासाठी एका आठवडय़ाची मुदत देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर त्यांना अमेरिकेच्या अटी मान्य कराव्याच लागतील.