
भेंडीचा चिकटपणा घालवण्यासाठी भेंडी धुतल्यानंतर पूर्णपणे कोरडी करून मगच चिरावी.
भेंडी शिजवून त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका, चिकटपणा निघून जाईल.
भेंडी शिजवताना त्यात एक चमचा भाजलेल्या बेसनचे पीठ घातल्यास चिकटपणा निघून जाईल आणि भेंडी कुरकुरीतही होतील.
तुम्हाला रस्स्याची किंवा वेगळ्या प्रकारची भाजी बनवायची असेल, तर त्यात दही किंवा चिंचेचा कोळ मिसळा.
भेंडीचे मोठे तुकडे केल्यास भेंडीचा चिकटपणा कमी होतो आणि भाजी मोकळी होते.
























































