
सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे आणि बँकिंग क्षेत्रामध्ये काम करू पाहणाऱ्या तरुणांसाठी तब्बल 12 हजारांहून अधिक पदांसाठी मेगाभरती केली जात आहे. ही पदे विविध विभागांत भरली जाणार आहेत. दहावी, आयटीआय आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, संगणक आधारित परीक्षा, काwशल्य चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशा विविध टप्प्यांतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. सरकारच्या विविध विभागांतील या भरतीमुळे मुंबईसह देशभरातील हजारो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी भरतीची अधिपृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचून पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत आणि अर्जाच्या अंतिम तारखेची माहिती घेऊन वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.
आयबीपीएसमार्फत प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनच्या 6 हजार 715 पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अखेरची तारीख 21 जुलै असून पूर्व परीक्षा ऑगस्ट 2026 मध्ये, तर मुख्य परीक्षा ऑक्टोबर 2026 मध्ये घेतली जाणार आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती https://www.ibps.in अधिपृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जुलै 2026 रोजी 20 ते 30 वर्षादरम्यान असायला हवे. नोकरीचे ठिकाणी संपूर्ण हिंदुस्थानात असणार आहे. सामान्य आणि ओबीसी उमेदवाराने 850 रुपये फी अर्जासोबत भरणे आवश्यक आहे.
भारतीय रेल्वेत टेक्निशियन पदांच्या 6 हजार 557 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यामध्ये टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नलच्या 323, तर टेक्निशियन ग्रेड 3 च्या 6 हजार 234 जागा भरल्या जाणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झाली असून अखेरची तारीख 29 जुलै 2026 आहे. सविस्तर माहिती https://www.rrbapply.gov.in या अधिपृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. यातील काही पदासाठी बीएससीमधील का@म्प्युटर सायन्स, इंजिनीअरिंग डिप्लोमा आवश्यक आहे, तर काही पदांसाठी 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय असणे आवश्यक आहे. उमेदवार हा 1 जुलै 2026 रोजी 18 ते 33 वर्षांपर्यंत असायला हवा.
बँक भरती
पदे 6,715
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज करण्याची अखेरची तारीख 21 जुलै 2026
पूर्व परीक्षा ऑगस्ट 2026
मुख्य परीक्षा ऑक्टोबर 2026
नोकरीचे ठिकाण संपूर्ण हिंदुस्थान
रेल्वे भरती
पदे 6,557
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज करण्याची अखेरची तारीख 29 जुलै 2026
परीक्षा नंतर कळवली जाईल
वयाची अट 18 ते 33 वर्षे
नोकरीचे ठिकाण संपूर्ण हिंदुस्थान





























































