
आंध्र प्रदेशातील वायएसआर कडप्पा जिह्यात गेल्या काही आठवडयांत कोविड-19 चे आठ रुग्ण आणि दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक पावले उचलली आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. विशेष आरोग्य पथकाने बाधित भागातील सुमारे 40 लोकांकडून नमुने गोळा केले. अहवालानुसार, 18 नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, उर्वरित नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे.




























































