
इराण आणि अमेरिकेतील युद्धबंदी संपल्याची घोषणा केल्यानंतर आखातील देशात पुन्हा युद्ध भडकले आहे. अमेरिकेने गेल्या दिवस दिवसांमध्ये इराणवर मोठे हल्ले करत सुमारे 300 ठिकाणांना लक्ष्य केले. त्यास प्रत्युत्तर देत इराणने अमेरिकेच्या सहा तळांवर क्षेपणास्त्रs डागत मोठा हल्ला केला. तसेच होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केली. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा युद्ध भडकल्यामुळे जगाचे टेन्शन वाढले आहे.
अमेरिकेने शस्त्रसंधी संपल्याचे जाहीर केल्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केली. आज इराणने सायप्रसच्या जीएफएस गॅलेक्सी या मालवाहू जहाजावर हल्ला केला. त्यात 11 हिंदुस्थानी खलाशी होते. या हल्ल्यानंतर अमेरिकेने तिसऱ्या टप्प्यातील हल्ले सुरू केले. अमेरिकेन सैन्याने इराणच्या 140 ठिकाणांवर हल्ले केले. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली. अमेरिका या भागात हस्तक्षेप थांबवत नाही, तोपर्यंत हा मार्ग खुला होणार नाही, असे इराणने म्हटले आहे.
अण्वस्त्रांपेक्षा होर्मुझ महत्त्वाचे – इराण
युद्ध भडकल्यानंतर होर्मुझचा मार्ग बंद झाला आहे. मात्र, डझनभर अण्वस्त्रांपेक्षा होर्मुझची सामुद्रधुनी जास्त महत्त्वाची असून इराण कोणत्याही परिसिथतीत होर्मुझचे रक्षण करेल, असे इराणने स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे या महत्त्वाच्या सागरी मार्गातून जहाजांची वाहतूक सुरळभ्त करण्यासाठी अमेरिकेने सैन्य तैनात केले आहे. ही सामुद्रधुनी बंद करण्याचा इराणला अधिकार नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे.
इराणचे हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर चिडलेल्या इराणने अमेरिकेच्या सहा लष्करी तळांना लक्ष्य केले. इराणने जॉर्डनमधील मुवाफक सल्ती या तळावर क्षेपणास्त्रांचा मारा केला. तेथे एमक्यू-9 ड्रोन ठेवलेले हँगर त्यात नष्ट करण्यात आले. याशिवाय ओमानमधील तळांवर इराणने ड्रोन हल्ले केले. अमेरिकेच्या जहाजांना इंधन पुरवणाऱ्या ठिकाणांना इराणने लक्ष्य केले.



























































