ताज हॉटेलला धमकीचा फोन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण मुंबईतील हॉटेल ताजमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आज पहाटे पोलीस नियंत्रण कक्षाला आला. फोन आल्यानंतर पोलिसांनी तपासणी केली असता काही आढळून आले नाही. शनिवारी रात्री नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात एक फोन आला. दाऊदने हॉटेल ताजमध्ये बॉम्ब ठेवला आहे असे सांगण्यात आले. याची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. काही वेळातच कुलाबा पोलीस, बॉम्बशोधक व नाशकचे (बीडीडीएस) पथक घटनास्थळी आले. बीडीडीएसच्या पथकाने हॉटेलमधील प्रवेशद्वार, स्विमिंग पूल, विविध हॉल आदी महत्त्वाच्या ठिकाणांची संपूर्ण तपासणी केली असता काही आक्षेपार्ह आढळून आले नाही. तो धमकीचा फोन हा तुर्भे परिसरातून आल्याचे उघड झाले. त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार केले आहे.