खड्ड्यांच्या तावडीतून तळोजा फेज-१ मधील रहिवाशांची सुटका, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तळोजा फेज १मधील रहिवाशांची खड्ड्यांच्या तावडीतून सुटका झाली आहे. फेज १ परिसरातील फेज परिसरातील प्रमुख पावसामुळे रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले होते. येथून जाताना नागरिकांसह वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याची गंभीर दखल घेऊन शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) याचा पाठपुरावा केल्यानंतर पालिका प्रशासनाने खड्डे बुजवले. त्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

तळोजा फेज १ परिसरातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली होती. खड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी अवस्था या रस्त्यांची झाली होती. पावसात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नसल्याने अपघात वाढत होते. रहिवाशांची कंबरतोड प्रवासातून सुटका करण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेविका प्रगती पाटील आणि नगरसेवक कैलाश पाटील यांनी पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केली. अखेर या पाठपुराव्याला यश आले असून पावसाने दडी मारताच पालिकेने खड्डे बुजवायचे काम हाती घेतले आणि नागरिकांचा प्रवास सुकर केला. नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा व इतर विकासकामांसाठी सातत्याने प्रयत्न करू, असे प्रगती पाटील यांनी सांगितले.