
कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुटपाथवर झोपलेल्या दाम्पत्यावर एका व्यक्तीने बांबूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे घडली. या हल्ल्यात ३६ वर्षीय तक्रारदार सोनाली पवार या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. याप्रकरणी एका काळू नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनाली पवार या ठाणे पश्चिम येथील वडारवाडी झोपडपट्टी परिसरात पती विनोद पवार आणि मुलांसह राहतात. दोघेही मजुरी करून उदरनिर्वाह करतात. विनोद पवार हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या घंटागाडीवर काम करतात. सोमवारी रबाळे येथे जाण्यासाठी हे दाम्पत्य रेल्वे स्थानकात आले होते. मात्र लोकल नसल्याने ते आनंद सिनेमाजवळील चप्पल दुकानाशेजारी फुटपाथवर झोपले होते. त्यावेळी काळू नावाचा एक व्यक्ती तेथे आला. ‘माझ्या जागेवर का झोपला?’ असा जाब विचारत त्याने विनोद पवार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.


































































