दोन आठवडे सुप्रिया सुळे यांना बोलण्यास बंदी ‘व्हॉइस रेस्ट’चा डॉक्टरांचा सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोमवारपासून लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना पुढील दोन आठवडे बोलण्यास बंदी घालण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांच्या घशाला सूज आल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला दिला आहे.

 

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सुप्रिया सुळे यांनी आपल्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती दिली आहे. त्यामध्ये त्या म्हणतात की, माझ्या घशाच्या आणि आवाजाच्या समस्येबाबत मी नुकतीच डॉ. मिलिंद कीर्तने यांची भेट घेतली. त्यांनी माझ्या घशात थोडी सूज असल्याचे निदान केले असून मला पूर्णपणे ‘व्हॉइस रेस्ट’ (आवाजाला पूर्ण विश्रांती) घेण्याचा सल्ला दिला आहे. यावर उपाय म्हणून मी ‘व्हॉइस थेरपी’ घेणार आहे. पुढील एक-दोन आठवडे भाषणे, मुलाखती व दीर्घकाळ बोलणे टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.