कोथिंबीर जास्त काळ टिकवण्यासाठी, हे करून पहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोथिंबीर किंवा पुदिना ताजा ठेवण्यासाठी पाण्याने धुऊन टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा. पाने स्वच्छ निवडून कोरड्या हवाबंद डब्यात किंवा ग्लासभर पाण्यात ठेवून रेफ्रिजरेटरमध्ये साठवा. यामुळे त्या दोन ते तीन आठवडे छान हिरव्यागार राहतात.

कोथिंबीर ग्लासमध्ये देठ पाण्यात बुडतील अशी उभी ठेवा. त्या ग्लासावर एक सैलसर प्लॅस्टिकची पिशवी किंवा झीपलॉक बॅग झापून फ्रिजमध्ये ठेवा. दर तीन दिवसांनी पाणी बदलल्यास कोथिंबीर खूप दिवस ताजी राहते.