चंद्रपुरातील विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे जोरदार आंदोलन, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला चंद्रपुरात विद्यार्थ्यांनी पाठिंबा आहे. या आंदोलनासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे हातात फलके घेऊन निदर्शने सुरू केली आहेत. .याशिवाय 4 विद्यार्थिनी उपोषणाला बसल्या आहेत. केंद्र सरकारने हे आंदोलन हुकूमशाही पद्धतीने हाताळल्याचा आरोप त्यांनी केलाय. नीट पेपर फूट प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.