उद्धव ठाकरे वाढदिवस साजरा करणार नाहीत! होर्डिंग, बॅनर लावू नका… एक देश एक भावना हेच सगळय़ांचे सूत्र हवे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या लोकभावनांचा आदर करून यावेळी वाढदिवस साजरा करणार नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केले.

अशा वातावरणात कोणताही उत्सव साजरा करता येणार नाही. माझ्या वाढदिवशी कोणीही होर्डिंग-बॅनर लावू नयेत, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. एक देश एक भावना हेच सगळ्यांचे सूत्र आहे, असे त्यांनी पुढे नमूद केले.

उद्धव ठाकरे मंगळवारी जंतरमंतर येथे आंदोलकांना भेटले. पोलीस लाठीमारातील जखमी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.