
यंदाच्या राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) क्रीडा स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच हिंदुस्थानी बॉक्सिंग संघासमोर मोठी अडचण उभी राहिली आहे. बेलफास्ट (आयर्लंड) येथून ग्लासगोला रवाना होताना संघाचे निम्मे सामान विमानतळावरच राहिले, त्यामुळे बॉक्सिंग साहित्य, किट तसेच उद्घाटन सोहळ्यासाठीचे अधिकृत पोशाख वेळेत ग्लासगोला पोहोचले नाहीत.
बेलफास्टहून ग्लासगोला जाणारे विमान आकाराने लहान असल्याने सर्व सामान एकाचवेळी नेणे शक्य झाले नाही. परिणामी हिंदुस्थानी संघाचे महत्त्वाचे साहित्य बेलफास्टमध्येच अडकून पडले. 24 जुलैपासून बॉक्सिंगच्या लढती रंगणार आहेत. हिंदुस्थानने या स्पर्धेत 22 बॉक्सर उतरवले असून, हे सर्व खेळाडू 12 जुलैपासून बेलफास्टमध्ये विशेष प्रशिक्षण शिबिरात सराव करत होते.
जागतिक विजेत्या जॅस्मिनचेसुद्धा सामान बेपत्ता
विश्वविजेती जॅस्मिन लांबोरिया (57 किलो), साक्षी चौधरी (51 किलो), परवीन हुड्डा (65 किलो), जादुमणी सिंह (55 किलो) आणि कपिल पोखारिया (90 किलो) यांचे सामान अद्याप ग्लासगोला पोहोचलेले नाही. याशिवाय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक सी. कुटप्पा यांची बॅगही गायब आहे. विशेष म्हणजे, याच महिन्यात हिंदुस्थानी संघ दोहाहून बेलफास्टला जात असतानाही सामानासंदर्भात अशाच प्रकारची अडचण निर्माण झाली होती.
महिला प्रशिक्षिकेचाही वेगळय़ा हॉटेलमध्ये मुक्काम
सामानाच्या गोंधळाबरोबरच हिंदुस्थानी संघाला निवास व्यवस्थेचाही फटका बसला आहे. महिला बॉक्सिंग संघाच्या प्रशिक्षिकेला खेळाडू ज्या हॉटेलमध्ये थांबल्या आहेत, तेथे खोली मिळाली नाही. त्यामुळे त्यांची व्यवस्था दुसऱया हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. याचा संघाच्या तयारीवर आणि प्रशिक्षक-खेळाडूंमधील समन्वयावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेला अवघे काही तास शिल्लक असताना हिंदुस्थानी बॉक्सिंग संघावर आलेल्या या दुहेरी संकटामुळे व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, स्पर्धेपूर्वीच हिंदुस्थानच्या पदकांच्या आशांना धक्का बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रकुल खेळांसाठी हिंदुस्थानचे वेळापत्रक
23 जुलै (गुरुवार)
दुपारी 2ः00 वाजता लॉन बाऊल्स गट फेरी
दुपारी 2ः00 वाजता लॉन बाऊल्स गट फेरी
24 जुलै (शुक्रवार)
दुपारी 1ः00 वाजता लॉन बाऊल्स गट फेरी
दुपारी 3ः30 वाजता बॉक्सिंग प्राथमिक फेरी
दुपारी 4ः30 वाजता जिम्नॅस्टिक्स अंतिम फेरी
सायंकाळी 5ः30 वाजता पॅरा पॉवरलिफ्टिंग अंतिम फेरी
रात्री 10ः30 वाजता पॅरा पॉवरलिफ्टिंग अंतिम फेरी
रात्री 11ः30 वाजता जलतरण अंतिम फेरी
25 जुलै (शनिवार)
दुपारी 1ः00 वाजता लॉन बाऊल्स गट फेरी
दुपारी 3ः30 वाजता बॉक्सिंग पहिली फेरी
दुपारी 4ः30 वाजता जिम्नॅस्टिक्स अंतिम फेरी
रात्री 9ः30 वाजता व्हीलचेअर बास्केटबॉल गट फेरी
रात्री 11ः30 वाजता जलतरण अंतिम फेरी
26 जुलै (रविवार)
दुपारी 1ः00 वाजता लॉन बाऊल्स गट फेरी
दुपारी 2ः00 वाजता दुपारी वेटलिफ्टिंग अंतिम फेरी
दुपारी 3ः30 वाजता बॉक्सिंग दुसरी फेरी
दुपारी 4ः30 वाजता जिम्नॅस्टिक्स अंतिम फेरी
संध्याकाळी 6ः30 वाजता वेटलिफ्टिंग अंतिम फेरी
रात्री 10ः30 वाजता जिम्नॅस्टिक्स अंतिम फेरी
रात्री 11ः00 वाजता वेटलिफ्टिंग अंतिम फेरी
27 जुलै (सोमवार)
दुपारी 1ः00 वाजता लॉन बॉल्स गट फेरी
दुपारी 2ः30 वाजता ऍथलेटिक्स पात्रता फेरी
दुपारी 3ः00 वाजता जलतरण प्राथमिक फेऱया
संध्याकाळी 5ः30 वाजता वेटलिफ्टिंग अंतिम फेरी
रात्री 8ः30 वाजता लॉन बॉल्स उपांत्य फेरी
रात्री 9ः30 वाजता व्हीलचेअर बास्केटबॉल गट फेरी
रात्री 11ः00 वाजता ऍथलेटिक्स अंतिम फेरी
रात्री 11ः30 वाजता जलतरण अंतिम फेरी
मध्यरात्री 12ः30 वाजता वेटलिफ्टिंग अंतिम फेरी
28 जुलै (मंगळवार)
दुपारी 1ः00 वाजता लॉन बॉल्स पदके
दुपारी 2ः30 वाजता ऍथलेटिक्स पहिली फेरी
संध्याकाळी 6ः30 वाजता वेटलिफ्टिंग अंतिम फेरी
संध्याकाळी 7ः30 वाजता लॉन बॉल्स गट फेरी
रात्री 11ः00 वाजता ऍथलेटिक्स अंतिम फेरी
रात्री 11ः00 वाजता वेटलिफ्टिंग अंतिम फेरी
29 जुलै (बुधवार)
दुपारी 1ः00 वाजता लॉन बॉल्स गट फेरी
दुपारी 2ः00 वाजता वेटलिफ्टिंग अंतिम फेरी
दुपारी 2ः30 वाजता ऍथलेटिक्स पात्रता फेरी
संध्याकाळी 6ः30 वाजता वेटलिफ्टिंग अंतिम फेरी
रात्री 11ः00 वाजता ऍथलेटिक्स अंतिम फेरी
30 जुलै (गुरुवार)
दुपारी 1ः00 वाजता लॉन बॉल्स गट फेरी
दुपारी 2ः30 वाजता ट्रक सायकलिंग पात्रता फेरी
दुपारी 2ः30 वाजता ऍथलेटिक्स पात्रता फेरी
संध्याकाळी 6ः30 वाजता वेटलिफ्टिंग अंतिम फेरी
रात्री 8ः30 वाजता ट्रक सायकलिंग अंतिम फेरी
रात्री 11ः00 वाजता ऍथलेटिक्स अंतिम फेरी
रात्री 11ः00 वाजता वेटलिफ्टिंग अंतिम फेरी
31 जुलै (शुक्रवार)
दुपारी 2ः30 वाजता ऍथलेटिक्स प्राथमिक फेऱ्या
दुपारी 3ः00 वाजता बॉक्सिंग उपांत्य फेरी
दुपारी 3ः30 वाजता ज्युडो प्राथमिक फेरी
रात्री 8ः30 वाजता ज्युडो अंतिम फेरी
रात्री 11ः00 वाजता ऍथलेटिक्स अंतिम फेरी
1 ऑगस्ट (शनिवार)
दुपारी 1ः00 वाजता लॉन बॉल्स गट फेरी स्टेज
दुपारी 2ः30 ऍथलेटिक्स अंतिम सामना
दुपारी 3ः00 बॉक्सिंग अंतिम सामना
सायंकाळी 7ः30 ट्रक सायकलिंग अंतिम सामना
रात्री 9ः00 लॉन बॉल्स उपांत्य फेरी
रात्री 9ः00 बॉक्सिंग अंतिम सामना
रात्री 11ः00 ऍथलेटिक्स अंतिम सामना
ऑगस्ट 2 (रविवार)
दुपारी 1ः30 ट्रक सायकलिंग अंतिम सामना
दुपारी 2ः30 ज्युडो प्राथमिक व अंतिम फेरी





























































