
कोका-कोला इंडियाचा स्वदेशी ब्रँड थम्स अपने क्रिकेटपटू जसप्रीत बुमराच्या सहभागासह ‘थंडरव्हील्स 3.0’ मोहिमेचे पुनरागमन जाहीर केले आहे. या उपक्रमाद्वारे हिंदुस्थानातील नव्या पिढीला बाइकिंगचा थरार आणि मोकळ्या रस्त्यांवरील स्वातंत्र्याचा अनुभव घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष खूण असलेली थम्स अपची पाकिटे स्कॅन करून ग्राहकांना थंडरव्हील्स बाईक आणि इतर आकर्षक रायडिंग बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. डिजिटल आणि सोशल प्लॅटफॉर्मवर रायडर्सना त्यांच्या साहसी प्रवासाच्या कथा शेअर करण्यासाठी प्रोत्साहन देत हिंदुस्थानातील बाइकिंग संस्कृतीला नवी चालना देण्याचा ब्रँडचा प्रयत्न आहे.





























































