
मुंबईचे जुळे शहर अशी ओळख असलेले ‘स्मार्ट सिटी’ ठाणे प्रचंड वेगाने बदलले आहे. सिमेंट काँक्रीटचे प्रशस्त रस्ते, उंचच उंच टॉवर्स, भव्य मॉल्स, मेट्रो प्रकल्प यामुळे शहराची पारंपरिक ओळखच बदलली आहे. याच ‘स्मार्ट’ ठाणे शहरात अजूनही चक्क शेती होतेय हे ऐकूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे. ठाण्याच्या येऊरमध्ये हा नजारा दिसत आहे. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने येऊरमधील शेतकरी शेतीच्या कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे त्यांची शेती पारंपरिक बैलजोडीच्या मदतीनेच सुरू आहे. ‘स्मार्ट’ ठाण्यातील हे ‘ग्रीन सिटी’चे दृश्य टिपले आहे छायाचित्रकार संजय देवकर यांनी.



























































