थोडक्यात – अकरावी प्रवेशासाठी आजपासून विशेष फेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई : इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून सुमारे १२.९८ लाख विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. अद्याप काही विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित न केल्याने त्यांच्यासाठी ४ ऑगस्ट २०२६ पासून विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष फेरीसाठी नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी तसेच भाग-१ मधील आवश्यक दुरुस्ती करण्याची सुविधा ४ ऑगस्ट सकाळी १० वाजल्यापासून ६ ऑगस्ट सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध राहील.

तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय पुरस्कारासाठी आवाहन

मुंबई तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार 2025 साठी 20 ऑगस्ट 2026 पर्यंत पेंद्र शासनाच्या https://awards.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन मुंबई शहरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले आहे. साहसी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱया व्यक्तींना युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयातर्फे हा प्रतिष्ठsचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. साहसी क्षेत्रातील आजीवन योगदान यासाठीही स्वतंत्र पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

पीएच.डी. छात्रवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करा

मुंबई अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई मार्फत अनुसूचित जातीतील मातंग व तत्सम जातीच्या पात्र विद्यार्थ्यांनी पीएच.डी.करिता अधिछात्रवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी केले आहे. पात्रता निकष, मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतच्या माहितीकरिता  https://www.arti.org.in  या अधिपृत संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.