
भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष आणि ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे राज्यभर चर्चेत आलेले विजय चौधरी यांना आज रात्री धुळ्यातून अटक करण्यात आली. अॅट्रॉसिटी कायद्यानुसार दाखल झालेल्या गुह्यात ही कारवाई करण्यात आल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्रातील विविध नेत्यांशी झालेल्या कथित दूरध्वनी संभाषणांमध्ये शिवीगाळ, पाडापाडीची भाषा, विविध व्यक्तींवर भ्रष्टाचाराचे आरोप तसेच आदिवासी महिला राज्यसभा खासदार, महिला खासदार, महिला आमदार आणि आदिवासी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप विजय चौधरी यांच्यावर आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता.





























































