
परीक्षांचे हॉलतिकीट तयार करण्यासाठी अपार आयडी अनिवार्य करण्यात आले असून, अपार आयडीशिवाय विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट तयार करता येणार नाही, असा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अपार आयडी तयार केलेला नाही किंवा अपार आयडी, एबीसी आयडी लिंकिंग अथवा आधार प्रमाणीकरणासंदर्भात अडचणी येत आहेत, त्यांच्यासाठी विद्यापीठाने 19 व 20 ऑगस्ट 2026 रोजी शिबिराचे आयोजन केले आहे.
मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस येथील अल्केश दिनेश मोदी इन्स्टिटय़ूट फॉर फायनान्शियल अँड मॅनेजमेंट स्टडीज येथे 19 व 20 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालकांच्या समन्वयाने हे शिबीर घेण्यात येणार आहे.




























































