
रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रतिष्ठत शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या माध्यमातून देशभरातील 5 हजार 100 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या उपक्रमाद्वारे पदवी विद्यार्थ्यांना 2 लाख, तर पदव्युत्तर विद्यार्थ्यांना 6 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या पुढाकाराने आतापर्यंत 33 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे. यंदाच्या वर्षी योजनेअंतर्गत पदवी विद्यार्थ्यांसाठी 5 हजार आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी 100 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याने पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यांना https://scholarships.reliancefoundation.org/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन रिलायन्सतर्फे करण्यात आले आहे.


























































