इंडिगोची वेबसाईट आठवडय़ात दुसऱ्यांदा बंद, प्रवाशांना तिकीट बुक करण्यात अडचण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एअरलाइन कंपनी इंडिगोची वेबसाईट शुक्रवारी पुन्हा एकदा ठप्प झाली. या आठवडय़ात इंडिगोच्या वेबसाइट आणि ऑनलाइन सेवांमध्ये दुसऱ्यांदा अडचण आल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

शुक्रवारी प्रवाशांना वेबसाईटवरून फ्लाइट बुक करताना अडचणी आल्या. तसेच काही यूजर्सला मोबाईल अॅपवरून लॉगिन करतानाही अडचणी आल्या. सिस्टीममध्ये अधूनमधून समस्या येत आहेत. यामुळे काही ग्राहकांना आमच्या ऑनलाइन सेवा वापरताना अडचणी येऊ शकतात. आमच्या टीम्स ही समस्या लवकरात लवकर ठीक करण्यासाठी काम करत आहेत, असे एअरलाईन इंडिगोकडून सांगण्यात आले.