पाच वर्षीय विधी प्रवेशाच्या पुढील फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या पुढील फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पहिल्या फेरीत २,६८२ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांत प्रवेश घेतला आहे. पहिल्या फेरीचे जागावाटप १८ ऑगस्ट रोजी झाले. १५,९१३ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरला होता. त्यापैकी ८,१३५ विद्यार्थ्यांना जागावाटप करण्यात आले.

दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना २३ ते २६ ऑगस्टदरम्यान पसंतीक्रम (ऑप्शन फॉर्म) भरता येईल. या फेरीचे जागावाटप २८ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर तिसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया होईल.