बाणगंगा तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण मुंबईतील बाणगंगा तलावात पोहायला गेलेला एक तरुण बुडाल्याची घटना आज घडली. शेखर रावल (19) असे त्या तरुणाचे नाव असून पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावात दुपारी दोनच्या सुमारास शेखर पोहायला गेला. तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. स्थानिकांनी त्याला पाण्याबाहेर काढले व एलिजाबेथ रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.