अलिबागच्या एसटीत कंडक्टरने दिली चक्क बोगस तिकिटे, फसवणुकीचा गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी कंडक्टरने प्रवाशांना बोगस तिकिटे दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहकाने तिकीट मशीनमध्ये छेडछाड करून १० प्रवाशांना एकाच क्रमांकाची तिकिटे दिली. तिकीट निरीक्षकांनी तपासणी केली असता बनावट तिकिटांचा भंडाफोड झाला. याप्रकरणी कंडक्टरविरोधात पोयनाड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलिबागहून पनवेलच्या दिशेने प्रवाशांना घेऊन एसटी निघाली. कंडक्टरने तिकिटे फाडली. मात्र ही बस पोयनाड एसटी थांब्यावर आली असता भरारी पथकातील तिकीट निरीक्षकांनी एसटी थांबवली आणि तिकिटांची तपासणी केली. त्यावेळी कंडक्टरने तिकीट मशीनमध्ये छेडछाड करून १० प्रवाशांना एकाच क्रमांकाचे तिकीट दिल्याचे समोर आले. निरीक्षण अहवालानुसार या प्रवाशांची ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ अशी नोंद केली होती. मात्र प्रत्यक्ष तिकिटांवरील क्रमांक आणि नोंदींमध्ये तफावत आढळून आली.