
वीटभट्टी व्यावसायिकांकडून २० हजार रुपयांची घेणाऱ्या ब्राह्मणगाव येथील तलाठी मिलिंद शिंदे व पोलीस पाटील पुंडलिक दमाने यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. दोन लाख रुपयांची रॉयल्टी आणि दंड कमी करण्यासाठी लाच मागितली होती.
ब्राह्मणगाव येथील वीटभट्टीचा मिलिंद शिंदे आणि पुंडलिक दमाने पंचनामा करून त्यांना सुमारे दीड ते दोन लाख रुपये दंड भरावा लागेल, अशी दमदाटी केली होती. दंड माफ करण्यासाठी तहसीलदारांना पन्नास हजार द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार त्यांच्याकडून पहिला हप्ता २० हजार रुपयांचा घेतला. हे पैसे घेत असताना एसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष नवलागे यांनी सापळा रचून दोघांवर झडप घातली.































































