रांचीमध्ये निवृत्त अधिकाऱ्याने संपवले जीवन, जवळ सापडली आठ पानांची सुसाईड नोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रांचीमध्ये एक सिद्धो-कान्हू पार्कजवळील एका फ्लॅटमध्ये 61 वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरातच एकच खळबळ लालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ही घटना उघडकीस आली असून, सुनील कुमार सिंह असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे.

सुनील कुमार सिंह हे मूळचे बिहारमधील पाटणा येथील रहिवासी होते. वर्षभरापूर्वीच ते रांचीचे उपविकास आयुक्त (DDC) या पदावरून निवृत्त झाले होते. त्यांचे कुटुंब पाटणा येथे असून, ते रांची येथील फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते. रविवारी या फ्लॅटमधील छताच्या पंख्याच्या हुकला त्यांचा मृतदेह टांगलेल्या स्थितीत आढळला. या घटनेबाबत माहिती देताना लालपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उत्तम कुमार यांनी सांगितले की, रिम्स रांची येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. प्राथमिक तपासावरून हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे दिसत आहे. सिंह हे तीव्र सांधेदुखी आणि इतर वृद्धत्वाशी संबंधित आजारांनी त्रस्त होते, ज्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनास्थळावरून पोलिसांना आठ पानांची ‘सुसाईड नोट’ सापडली आहे. या नोटमध्ये त्यांनी आपल्या आजारपणाबद्दल आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल सविस्तर माहिती लिहिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे अचूक कारण स्पष्ट होईल. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.