
वाराणसीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानातील कार्गोमध्ये धुराचा अलार्म वाजल्याने विमानाचे गुरुवारी सकाळी लखनौ विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. आयएक्स 1253 या विमानाने सकाळी 8 वाजता वाराणसी विमानतळावरून उड्डाण केले होते. थोड्याच वेळात कार्गोमध्ये धूर शोधण्याचा अलार्म वाजू लागल्यानंतर वैमानिकाने सकाळी 8.52 वाजता लखनौ विमानतळावर लँडिंग केले.



























































