सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. आंबेडकरांवरील विशेष पुस्तक, पालिका शाळांमध्ये ‘संविधानिक मूल्ये’ रुजणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच संविधानिक मूल्ये, नागरी जबाबदारी रुजवण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष पाऊल उचलले आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता पहिली ते दहावीच्या 3 लाख 31 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी हा विशेष शैक्षणिक कार्यक्रम विकसित करण्यात येणार आहे.

याअंतर्गत इयत्ता सहावीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित पुस्तकाची छपाई करण्यात येणार आहे. याबाबतचा 8 कोटी 90 लाख 83 हजार 161 खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीच्या पटलावर येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व राज्य अभ्यासक्रम आराखडय़ानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालिकेने हा पृती आधारित उपक्रम आखला आहे.

‘जेम’ पोर्टलवरून कंत्राटदाराची निवड

या कामासाठी ‘जेम’ पोर्टलवर ‘प्रिंटिंग सर्व्हिसेस’ वर्गवारीतून निविदा मागवण्यात आल्या होत्या. यामध्ये तीन पंपन्यांनी सहभाग घेतला होता. तांत्रिक व नमुना पडताळणीनंतर तिन्ही पंपन्या पात्र ठरल्या. अंतिम लिलावात मे. दिशातरंग व्हेंचर्स प्रा.लि. पंपनीची निवड झाली. या पंत्राटदाराने अंदाजापेक्षा 3.52 टक्के कमी दर सादर केल्याने सुमारे 8 कोटी 90 लाख या मंजूर पंत्राट रकमेवर त्यांची निवड करण्यात आली आहे.

पर्यावरणपूरक गणराया

मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रविवारी गणरायाची मूर्ती भक्तिमय वातावरणात मंडपात आणली. माटुंगा कार्यशाळेत कागदापासून बनवलेल्या 22 फूट उंच पर्यावरणपूरक ‘अल्ट्रामाउंटचा राजा’चे आगमन ढोल-ताशांच्या गजरात झाले. बाप्पाच्या मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी झाली.