शरीरीत आयोडीनची कमतरता जाणवतेय? आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयोडीन हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असणारे एक सूक्ष्म पोषणद्रव्य आहे. जे थायरॉइड ग्रंथीचे कार्य सुरळीत चालवण्यासाठी आणि शरीरातील ऊर्जेचे संतुलन राखण्यासाठी महत्त्वाचे ठरते. शरीरात आयोडीनची कमतरता निर्माण झाल्यास थकवा जाणवणे, वजन अचानक वाढणे, त्वचा कोरडी पडणे आणि गळ्याला सूज येणे (गलगंड) यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हालाही अशी लक्षणे जाणवत असतील, तर आहारात काही सोपे आणि पोषक बदल करून तुम्ही आयोडीनची ही कमतरता सहज भरून काढू शकता. आयोडीनची पातळी योग्य राखण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा, ते जाणुन घ्या.

आयोडिनयुक्त मीठ: शरीरीत आयोडीनची कमतरता जाणवतेय? आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश!रोजच्या स्वयंपाकात साध्या मिठाऐवजी आयोडिनयुक्त मिठाचा वापर करणे हा आयोडिन मिळवण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.

दूध : एक कप सुमारे २५० मिली दुधामधून शरीराला आवश्यक असलेल्या दैनंदिन आयोडिनपैकी ५०% पेक्षा जास्त आयोडिन मिळते.

दही / ग्रीक योगर्ट : दह्यामध्ये भरपूर प्रमाणात आयोडिन आणि प्रोटीन असते.

पनीर आणि चीज : चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थही आयोडिनचा चांगला स्रोत आहेत.

अंडी: अंड्याच्या पिवळ्या भागात आयोडिनची मात्रा जास्त असते. रोज एक उकडलेले अंडे खाल्ल्याने शरीराला सुमारे ३१ मायक्रोग्राम आयोडिन मिळते.

कॉड फिश आणि ट्युना : समुद्रातील माशांमध्ये नैसर्गिकरित्या आयोडिन मुबलक प्रमाणात असते.

झींगे आणि कोळंबी: या माशांमध्येही आयोडिन चांगले असते.

सुका मेवा: सुकवलेले आलुबुखार आणि काही प्रकारचा ड्रायफ्रूट्समध्येही कमी-अधिक प्रमाणात आयोडिन असते.