मुंब्र्यात तरुणांच्या हाती शिवबंधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारच्या थापेबाजीला कंटाळून मुंब्यातील स्थानिक असंख्य तरुणांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी या तरुणांच्या हातात शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात स्वागत केले.

ठाण्यासह मुंब्रा परिसरात शिवसेना पक्षाची संघटनात्मक ताकद वाढावी यासाठी गुरुवारी मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक २६ मध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सदस्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

यावेळी जीवनबाग येथील साजिद, युसूफ, दानिश, मुर्शिद, मुजीब, इरफान तसेच दातूवाडी येथील साजिद शेख, अरमान, नुमन, फैसल सय्यद, सक्रिना, फरहान, अंजन शेख आणि रेतीबंदर या भागांतील शबनम शेख, शाहिस्ता शेख, सोबरा सय्यद, अंजुम शेख, उमरा वस्ता, सबरीना बर्टर, सोना शेख, पिंकी दामोदर, शाहिद शेख, शेरबानो शेख आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी कळवा, मुंब्रा, दिव्याचे संपर्कप्रमुख साठविलकर, उपशहरप्रमुख विजय चव्हाण, अनिश कुरेशी, शहर संघटक शाहीन घड्याली, उपशहर संघटक फरहा नाझ, विभागप्रमुख शंकर डांगे, संजय सिंग, नजर अब्बास, शाखाप्रमुख अल हिमद चौधरी, अनवर कपाडिया आदी पदाधिकारी उपस्थित होते.