
अभिनेत्री प्रिया बापट व अभिनेता उमेश कामत यांनी त्यांच्या मुंबईतील घराचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. प्रिया व उमेशने त्यांच्या या 1500 चौरस फूटाच्या घराला अगदी एस्थेटीक लूक दिला आहे. चाहत्यांना त्यांचे घर आवडले असून अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.


























































