
‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी ‘एक्स’वर मुख्यमंत्रीपदाचे बनावट राजीनामा पत्र पोस्ट करत ‘मी अपयशी ठरल्याने राजीनामा देतोय, मोदीजींचे आभार,’ असा उपरोधिक टोला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांना लगावला. या पत्राद्वारे त्यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेचा बोजवारा आणि सागर जिल्ह्यातील बनावट दारू दुर्घटनेवरून सरकारला धारेवर धरले.
मध्य प्रदेशातील बालाघाट येथे आदिवासी बालकांच्या मृत्यूची पाहणी करण्यासाठी गेलेले दीपके यांना विरोधाचा सामना करावा लागला. या घटनेनंतर दीपके यांनी सरकारवर निशाणा साधला. बालाघाटमध्ये संसर्गजन्य आजाराने 30 हून अधिक बालकांचा मृत्यू झाला. याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने राज्य आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग आणि बालाघाट जिल्हाधिकाऱयांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.


























































