
पेइंग गेस्ट (पीजी) अग्रीमेंट तयार करण्यासाठी, तुम्ही घरमालक असा किंवा पेइंग गेस्ट, दोन्ही पक्षांच्या सुरक्षेसाठी लेखी करार असणे अत्यंत आवश्यक आहे.
भाडे करार हा घरमालक-भाडेकरू संबंध निर्माण करतो आणि मालमत्ता हस्तांतरण कायदा, 1882 अंतर्गत कायदेशीर भाडेकरू हक्क प्रदान करतो.
घरमालक आणि पीजी राहणाऱया व्यक्तीचे नाव, पूर्ण पत्ता, आधार कार्ड क्र., महिन्याचे भाडे किती, ते कोणत्या तारखेला भरायचे आणि सिक्युरिटी डिपॉझिट किती हे नमूद करावे.
पाणी-वीज बिल, वायफाय आणि जेवणाचा खर्च भाडय़ात समाविष्ट आहे की वेगळा, याचा स्पष्ट उल्लेख करा. रूममधील सुविधा नोटीस पिरीयड या बाबी अॅग्रीमेंटवर असाव्यात.
100 किंवा 500 च्या स्टॅम्प पेपरवर अग्रीमेंट करून त्यावर घरमालक आणि पीजी राहणाऱया व्यक्तीने प्रत्येक पानावर स्वाक्षरी करावी. अग्रीमेंट नोटराईज्ड करून घ्या.



























































