विसर्जनासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणपती विसर्जनासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना बागलाण तालुक्यातील नामपूर येथे घडली. खाजगी क्लासमधील दोन विद्यार्थी गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी मोसम बंधाऱयात उतरले असता त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने नामपूरसह उत्तराने परिसरात शोककळा पसरली आहे. अथर्व दीपक पगार (17) आणि प्रसाद दादाभाऊ वाघ (17) अशी या दोन विद्यार्थ्यांची नावे आहेत.