बाप रे बाप.. धावत्या एक्सप्रेसमध्ये स्लिपर कोचमधील सीटखालून निघाला भला मोठा साप, पहा Video

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लांब पल्ल्याची एक्सप्रेस… रात्रीची वेळ आणि अचानक एकच आरडोओरडा सुरू होतो. कोलकाताला जाणाऱ्या कटिहार एक्सप्रेसमध्ये काहीसे असेच चित्र होते. स्लिपर कोचमधील एका सीटखालून जवळपास 5 ते 6 फूट लांबीचा साप अचानक बाहेर आले. यामुळे प्रवासांची चांगलीच बोबडी वळली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोलकाताकडे जाणाऱ्या धावत्या कटिहार एक्सप्रेस ट्रेनमध्ये रात्रीच्या वेळी साइड लोअर बर्थच्या खाली अचानक एक साप आढळला. यामुळे स्लीपर कोचमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सोशल मीडियावर एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ट्रेनच्या डब्यात साप आलाच कसा, असा सवाल करत युझर्सनी रेल्वेच्या प्रशासकीय कारभारावर ताडेशे ओढत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.