अभ्यासात मागे पडणाऱ्या मुलांसाठी ‘बालदृष्टी’ योजना; तीन लाख विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फळा स्पष्ट दिसत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे येत असतानाही त्यांची समस्या अनेकदा दुर्लक्ष किंवा अभ्यासातील अनवधान समजली जाते. हा अडथळा दूर करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या समन्वयाने ‘बाल दृष्टी’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. तीन वर्षांत महापालिकेच्या 1200 शाळांमधील तीन लाख विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करून दोषांचे निदान, उपचार आणि चष्मे उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली आहे.