टेस्लाने आणली हवेत उडणारी कार; पहिल्यांदाच वाहनात रॉकेटची टेक्नोलॉजी, बुकिंगला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टेस्ला कंपनीने शुक्रवारी हवेत उडणारी कार सादर केली. ही सुपरकार नेक्स्ट जेन रोडस्टर असून या कारला अमेरिकेतील टेक्सास येथील स्पेसएक्स रॉकेट टेस्टिंग फॅसिलिटीमध्ये सादर करण्यात आले. टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून ऑटोमोबाइल इंडस्ट्री अवाक् झाली आहे. लाँचिंगवेळी ही कार चक्क हवेत उडत होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. या कारमध्ये रॉकेट टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला असून या कारच्या बुकिंगला सुरुवात झाली असून या कारचे उत्पादन 2028 पासून सुरू होणार आहे.

रॉकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या या थ्रस्टर्सच्या मदतीने ही कार एक सेकंदात ताशी 97 किमीचा वेग पकडू शकते. टेस्लाने आपल्या सेकंड जनरेशन रोडस्टरचे पहिल्यांदा प्रदर्शन नोव्हेंबर 2017 मध्ये केले होते, मात्र त्यानंतर त्याचे लाँचिंग आणि उत्पादनाची तारीख अनेक वेळा लांबणीवर पडली. सुरुवातीला ही कार 2020 पर्यंत रस्त्यावर येईल अशी अपेक्षा होती, मात्र डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या आव्हानांमुळे याला आठ वर्षांचा विलंब झाला आहे. टेस्लाने पहिली इलेक्ट्रिक कार ‘ओरिजिनल रोडस्टर’ 2008 मध्ये लाँच केली होती.

मस्क काय म्हणाले

रोडस्टर ही टेस्लाची एकमेव अशी कार असेल जी केवळ मॅन्युअली चालवता येईल. ती अत्यंत सुरक्षिततेचा विचार करून डिझाइन केलेली नाही. कारमध्ये हवेत नियंत्रण ठेवण्यासाठी अल्टिटयूड थ्रस्टर्स आणि मागील बाजूस मुख्य थ्रस्टर्स आहेत. ती अगदी रॉकेटप्रमाणे उड्डाण करू शकते आणि हवेत कसरती करू शकते. हे सर्व टेस्ला आणि स्पेसएक्सच्या अभियंत्यांनी मिळून केलेल्या कामाचा परिणाम आहे, असे मस्क म्हणाले.