IND vs NZ ODI – शुभमन गिल मैदानात उतरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-20 मालिकेत न्यूझीलंडला धूळ चारण्याच्या तयारीत असलेल्या हिंदुस्थानी संघाने आता वन डे मालिकेसाठीही रणशिंग फुंकले आहे. कर्णधार शुभमन गिलने ऑकलंडमध्ये दाखल होताच सरावाचे मैदान गाठले आणि फलंदाजीचा कसून सराव सुरू केला. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांचा मारा आणि तेथील वेगळी खेळपट्टी यांचा अंदाज घेत गिलने मालिकेपूर्वीच आपली बॅट तावूनसुलाखून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे 4 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेत हिंदुस्थानी संघ कोणती आक्रमक रणनीती आखतो, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

गिलच्या तयारीचे वैशिष्ट्य म्हणजे सरावातील प्रत्येक बाबीवर त्याचे बारीक लक्ष आहे. सराव सत्रात त्याच्या कपाळावर टेंपल नावाचे फिटनेस ट्रकिंग उपकरण दिसले. या उपकरणाच्या माध्यमातून प्रशिक्षणातील हालचालींवर लक्ष ठेवले जाते. फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांच्याशी चर्चा केल्यानंतर गिलने नेटमध्ये फलंदाजीचा सराव केला. या मालिकेत फलंदाज म्हणूनही मोठी कामगिरी करण्याचा त्याचा निर्धार आहे.