असं झालं तर- आयटीआर भरल्यानंतर ई- पडताळणी केली नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  1. IIR फाईल केल्यानंतर ३० दिवसांच्या आत त्याची E-verification करणे अनिवार्य आहे. पडताळणी न केल्यास तुमचा भरलेला IIR रद्दबातल ठरवला जातो.
  2. आयकर भरणारा करदाता सुधारित किंवा विलंबित आयटीआर दाखल करू शकतो. हे तेव्हाच करता येईल जेव्हा सुधारित आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत शिल्लक असेल.
  3. जर करदात्याने प्राप्तिकर रिटर्न भरल्यानंतर निर्धारित वेळेत आयटीआरची पडताळणी केली नाही, तर आयकर विभाग ते अवैध ठरवतो.
  4. आयकर कायद्यानुसार जर आयटीआर अवैध घोषित केला गेला, तर आयकर विभाग त्या प्राप्तिकर रिटर्नला जणू ते नाही असे मानतो.
  5. प्राप्तिकरदाते सुधारित आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत असतानाच तो दाखल करू शकतात. अन्यथा त्याला त्या वर्षासाठी आयकर भरण्यापासून वंचित ठेवले जाते.