
तांत्रिक व भौगोलिक अडचणींमुळे खरिपाची ऑनलाईन पीक नोंदणी जिथे शक्य होत नाही, तिथे आता ‘ई-फेरफार’द्वारे पीक पाहणी करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.
पेंद्र शासनाच्या ’डिजिटल क्रॉप सर्व्हे’ मोबाईल अॅपमध्ये शेतातील गटांचे अंतर अधिक दर्शविणे, गावांचे नकाशे परस्पर बदलणे किंवा काही गावांचे नकाशे व गट क्रमांक उपलब्ध नसणे यांसारख्या तांत्रिक व भौगोलिक अडचणी येत आहेत. अशा त्रुटींमुळे शेतकऱ्यांची पीक नोंदणी प्रलंबित राहू नये, म्हणून चालू खरीप हंगामाकरिता ‘ई-फेरफार’ प्रणालीद्वारे तलाठी स्तरावर पीक पाहणीची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.



























































