असं झालं तर…मोबाईलचा डेटा डिलीट झाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
मोबाईलमधील महत्त्वाचा डेटा डिलीट झाल्याचे समजताच फोन वापरणे बंद करून नवीन फोटो काढणे, अ‍ॅप्स डाऊनलोड करणे किंवा इंटरनेट वापरणे टाळा. गॅलरी किंवा फाइल मॅनेजरमधील रीसेंटली डिलीट किंवा ट्रश/रिसायकल बिन फोल्डर तपासा. जिथून तुम्ही तो सहज ‘रिव्हर्स’ किंवा ‘रिस्टोर’ करू शकता.
फोनमध्ये गुगल फोटोज, गुगल ड्राईव्ह किंवा आयक्लाउडचे ऑटो-बॅकअप सुरू असेल, तर त्या अ‍ॅप्समध्ये लॉग-इन करून तुमचा डेटा पुन्हा डाऊनलोड करू शकता. व्हॉट्सअ‍ॅपचा डेटा डिलीट झाला असेल, तर व्हॉट्सअ‍ॅप चॅट बॅकअपचा वापर करा. अ‍ॅप अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल केल्यास जुना बॅकअप रिस्टोर होतो. डेटा न मिळाल्यास, मोबाईल कॉम्प्युटरला जोडून ‘डेटा रिकव्हरी सॉफ्टवेअर’चा वापर करा किंवा प्रोफेशनल मोबाईल मेकॅनिकची मदत घ्या.