
साठ वर्षांची दमदार परंपरा, कबड्डीवरील निष्ठा आणि हीरक महोत्सवी वर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी यंग भारत सेवा मंडळाच्या वतीने कुमार गटाची राज्यस्तरीय कबड्डी आयोजित करण्यात आली आहे. प्रभादेवीच्या राजाभाऊ साळवी मैदानावर 23 ते 27 नोव्हेंबरदरम्यान भिकाजी भारती चषकासाठी तब्बल पाच दिवस कबड्डीचा धुरळा उडणार असून, मुंबईसह उपनगर, ठाणे आणि पालघर जिह्यांतील 12 नामवंत कुमार संघ आपले कौशल्य पणाला लावतील.
मुंबई शहरातील शिवनेरी, अमर, यश, गुड मॉर्निंग, विजय क्लब, सिद्धीप्रभा आणि अंकुर स्पोर्ट्स क्लब या नामांकित संघांच्या सहभागामुळे स्पर्धेतील चुरस आणखी वाढणार आहे. मुंबई शहरच्या संघांना तगडे आव्हान देण्यासाठी उपनगर, ठाणे आणि पालघर या जिह्यातील संघांचा सुस्साट खेळ प्रभादेवीकरांना अनुभवता येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला 35 हजार रुपये आणि मानाचा चषक, तर उपविजेत्या संघाला 25 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱया संघांनाही रोख पुरस्कार देऊन त्यांच्या कामगिरीचे काwतुक केले जाणार आहे.
यंग भारत सेवा मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त ही स्पर्धा दणक्यात साजरी करण्याचा निर्धार मंडळाने केला आहे. हीरक महोत्सवाचा उत्सव केवळ सोहळय़ापुरता मर्यादित न ठेवता कबड्डीच्या मैदानावरही त्याचा दणका दाखवून देऊ, असा विश्वास मंडळाचे प्रमुख कार्यवाह शंकर पाटकर यांनी व्यक्त केला.





























































