
नवी दिल्ली ः बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या गेल्या दोन वर्षांपासून हिंदुस्थानात आश्रयाला आहेत. त्यांना परत पाठवण्याची तयारी पेंद्र सरकारकडून केली जात आहे. पासपोर्ट पत्रावरील शेख हसीना यांची सही बनावट असल्याचा आरोप बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांचे राजकीय सल्लागार मोहम्मद रशीद खान यांनी केला आहे. रशीद खान यांनी फेसबुक पोस्टद्वारे हा आरोप केला आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सर्व अधिपृत कागदपत्रांवर बंगाली भाषेत सही केली होती. त्यामुळे त्यांच्या एनआयडीवर नोंद असलेल्या सहीपेक्षा वेगळी सही आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
गोल्डी ब्रारवर 1.62 कोटींचे बक्षीस
जालंधर ः सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येसह अनेक प्रकरणांमध्ये वाँटेड असलेल्या गँगस्टर गोल्डी ब्रारवर कॅनडाने 2.5 लाख पॅनेडियन डॉलर जवळपास 1.62 कोटी रुपये बक्षीस जाहीर केले आहे. त्याला पकडून देण्यात मदत करणाऱया किंवा त्याच्याबाबत ठोस माहिती देणाऱया व्यक्तीला हे बक्षीस मिळेल. भारतातून फरार असलेला गोल्डी आता पॅनडाच्या मोस्ट वॉण्टेड फरार आरोपींच्या यादीतही अव्वल क्रमांकावर आहे. अमेरिकेची तपास यंत्रणा ‘एफबीआय’नेही गोल्डीचा आपल्या दहा मोस्ट वॉण्टेड फरार आरोपींच्या यादीत समावेश केल्यानंतर हे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
मुख्याध्यापिकेला पाच वर्षांचा तुरुंगवास
जकार्ता ः इंडोनेशियातील योग्याकार्ता शहरातील एका डे-केअर सेंटरमध्ये 53 मुलांना मारहाण आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी मुख्याध्यापिकेला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लिटल अरेशा सेंटरमधील कर्मचारी मुलांचे हात-पाय कापडाने बांधून ठेवत होते. सेंटरमध्ये असलेल्या 103 मुलांपैकी 53 मुलांशी गैरवर्तन करण्यात आले होते. न्यायालयाने अनिता यांना 51 कोटी इंडोनेशियन रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंड न भरल्यास त्यांची मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव केला जाईल.


























































