
सर्वप्रथम डोशाच्या पीठाचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. साधारणपणे तीन कप तांदूळ आणि एक कप उडीद डाळ, थोडे पोहे, थोडे मेथीदाणे यामुळे डोशाचा रंग, पोत आणि चव अधिक चांगली येते. हवामानानुसार 8 ते 12 तास पीठ आंबण्यासाठी ठेवावे.
पिठात छोटे बुडबुडे दिसू लागले की ते वापरण्यास तयार झाले असे समजावे. डोशाचे पीठ खूप घट्ट किंवा खूप पातळ नसावे. योग्य घट्टपणामुळे डोसा सहज पसरतो आणि पातळ होतो. पसरट लोखंडी तव्यावर केलेला डोसा अधिक कुरकुरीत होतो. तवा अतिगरम नसावा.

























































